आजच्या डिजिटल युगात मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण हाच मोबाईल आणि त्यातील सिम कार्ड आता सायबर गुन्हेगारांच्या नव्या फसवणुकीचे साधन बनत आहे.
काय घडतंय नेमकं?
सायबर चोर लोकांना फोन करून स्वतःला पोलीस अधिकारी किंवा मोबाईल कंपनीचा प्रतिनिधी म्हणून ओळख देतात. ते असे सांगतात की — > “तुमच्या नंबरवरून कोणाला तरी व्हिडिओ किंवा मेसेज पाठवला गेला आहे, आणि त्या व्यक्तीने तुमच्याविरुद्ध तक्रार केली आहे.” ते पुढे तुमचं नाव, मोबाईल नंबर किंवा काही वैयक्तिक माहिती सांगून विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यानंतर बोलण्यात ठेवून ते तुम्हाला ओटीपी विचारतात, किंवा एखादी लिंक / APK फाईल डाउनलोड करण्यास सांगतात. हीच लिंक किंवा फाईल तुमचा मोबाईल, व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक करण्यासाठी वापरली जाते.
आपण सतर्क कसे राहावे?
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे आपल्या हातात आहे. खालील टिप्स नक्की पाळा
1. कोणत्याही अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका. – पोलीस किंवा मोबाईल कंपनीचे खरे अधिकारी कधीच OTP किंवा लिंक मागत नाहीत.
2. अशा कॉलवर संशय आल्यास लगेच कॉल कट करा. – नंतर थेट आपल्या सिम कंपनीच्या अधिकृत हेल्पलाइन नंबरवर किंवा जवळच्या गॅलरीत जाऊन चौकशी करा.
3. मोबाईलमध्ये अनोळखी आयकॉन्स दिसल्यास किंवा काही बदल जाणवल्यास, – विश्वासू टेक्निकल व्यक्तीला दाखवा. स्वतःच काही डिलीट किंवा फॉरमॅट करू नका.
4. मोबाईल कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. – प्रवासात किंवा सार्वजनिक ठिकाणी फोन दाखवू नका.
5. फोन नियमित अपडेट ठेवा. – जुन्या सिस्टीममध्ये सुरक्षा कमकुवत असते.
6. मोबाईल हॅक झाला असल्यास, तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या. – उशीर न करता घटनेची माहिती द्या.
तांत्रिक मदतीसाठी: जर तुमचा मोबाईल, व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाला असेल, किंवा तुम्हाला संशयास्पद कॉल / मेसेज आले असतील तर –
Suyash Infosolutions, Kalyan संपर्क: +91 9321700024 / +91 9821214643 सायबर सुरक्षा, आणि मोबाईल सिक्युरिटी संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी संपर्क साधा. www.suyashinfosolutions.in www.cyberinfo.space